Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब | पुढारी

Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसागणिक वाढत असल्याने, स्मार्ट फोन हाताळताना प्रचंड दक्षता घ्यावी, असे वेळोवेळी आवाहन केले जाते. मात्र, अशातही लोकांची फसवणूक होत असल्याने या भामट्यांचे फावत आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार समोर आला असून, व्हॉट्सॲपवर आलेल्या एका ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार रुपये लंपास झाले आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, तिडके कॉलनी येथील रहिवासी योगेश गिरजाराम जाधव यांच्या मोबाइलवरील व्हॉट्सॲपवर एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून ‘टुडे डिलिव्हरी’ नावाच्या ॲपची लिंक आली. त्यांनी उत्सुकता म्हणून ती लिंक ओपन केली असता त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून सुरुवातीला ५० हजार व नंतर ४० हजार असे एकूण ९० हजार रुपये डेबिट झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन अनोळखी व्यक्तीविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button