Nashik : नाशिकरोडला चालती बस पेटून दोघांचा मृत्यू, ब्रेक फेल झाल्याने घटना | पुढारी

Nashik : नाशिकरोडला चालती बस पेटून दोघांचा मृत्यू, ब्रेक फेल झाल्याने घटना

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक – पुणे रस्त्यावरील पळसे गावाच्या चौफुलीवर आज गुरुवारी बारा वाजेच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पेट घेतला. यात बस मधील सर्व ४३ प्रवाश्यांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाल्याने ते सुखरूप आहे. मात्र पेटती बस दोन दुचाकीवर जाऊन आदळली. यात दोन दुचाकीस्वार पेटत्या बसच्या खाली सापडल्याने त्यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाही.

ही बस सकाळी राजगुरू नगर (पुणे) येथून नाशिकच्या दिशेने निघाली होती. एम एच ०७ सी.७०८१ या क्रमांकाची ही बस असून दुपारी बारा वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दल अन् पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बसची आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आणली. दरम्यान नाशिक येथील बस पेटण्याची ही तिसरी मोठी घटना आहे. यापूर्वी मिर्ची हॉटेल येथे खाजगी बस पेटून प्रवासी ठार झाले होते तर वणी गड ( नांदूरी) येथेही बस पेटली होती. यानंतर आज पळसे येथे घटना घडली. जखमी प्रवाशांना बिटको येथे उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

Back to top button