धुळे : अवैध लाकूड वाहतुकीवर पिंपळनेर वनविभागाची कारवाई | पुढारी

धुळे : अवैध लाकूड वाहतुकीवर पिंपळनेर वनविभागाची कारवाई

पिंपळनेर,(साक्री) : पुढारी वृत्तसेवा : अवैध लाकूड वाहतुकीवर  पिंपळनेर वनविभागाने कारवाई केली. सागवान लाकडाचे चार नग जप्त करण्यात आले. दरम्यान,कोणीही वन्यजीव तसेच अवैध लाकडाची वाहतूक करताना आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन वनक्षेत्रपालांनी केले आहे.

दुचाकीवरुन सागवान लाकडाची अवैध वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पिंपळनेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.  त्यानुसार वनविभागाच्या पथकाने पिंपळनेर, डांगशिरवाडे, वासाॅ ते गव्हाणपाडा रस्त्यावर पेट्रोलिंग सुरु केली. पेट्रोलिंग करताना संशयित दुचाकीस्वार दिसला. पथकाने त्यास अटकाव केला असता  दुचाकीस्वाराने मुद्देमाल सोडून पळ काढला. यावेळी पथकाला ०.१५४ घ.मी.चे सागवान लाकडाचे चार चौकोनी नग पथकाने जप्त केले आहेत.

हेही वाचा  

Back to top button