जळगावात शिवसेनेचा ठाकरे गट सक्रीय, विविध उपक्रम घेतले हाती | पुढारी

जळगावात शिवसेनेचा ठाकरे गट सक्रीय, विविध उपक्रम घेतले हाती

जळगाव : शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सक्रिय झाला असून, विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. आता युवसेनेच्या वतीने मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या पुढाकाराने मतदार नोंदणी शिबिर घेण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक सचिन पाटील, युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडिया, अमित जगताप, युवासेना जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, निलेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रितम शिंदे, उपजिल्हा युवाधिकारी विशाल वाणी, महानगर युवाधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, यश लोढा, प्रशांत वाणी, रोहित भामरे, गजेंद्र चौधरी यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातील नवीन मतदारांनी या नोंदणीचा लाभ घेतला.

Back to top button