नाशिक : हाती काही न लागले नाही म्हणून ….सीसीटीव्हीची हार्ड डिस्क चोरी | पुढारी

नाशिक : हाती काही न लागले नाही म्हणून ....सीसीटीव्हीची हार्ड डिस्क चोरी

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
येथील निमोण नाका परिसरात असलेल्या माउली मेडिकल या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी तोडून चक्क सीसीटीव्हीच्या हार्ड डिस्क चोरी केली.

नांदूरशिंगोटे येथे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर विविध दुकानदारांच्या शटर तोडून चोरट्यांंनी चोर्‍या केलेल्या आहेत. यापूर्वी सीसीटीव्ही फुटेज हाती लागूनही अद्याप या चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नसतानाच शनिवारी (दि. 8) पहाटे सव्वापाच दरम्यान माउली मेडिकलचे शटर तोडून आतील सामान अस्ताव्यस्त टाकले व हाती काहीही न लागल्यामुळे अखेरीस त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्हीची हार्ड डिस्कच चोरून नेली. सीसीटीव्हीमध्ये आपले चेहरे दिसू नये व आपल्या हाती काही घबाड लागलेले नसल्याने चोरट्यांनी सीसीटीव्ही हार्ड डिस्क घेऊन चोरटे पसार झाले. हा सर्व प्रकार शेजारी असलेल्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये त्यांची झालेली एन्ट्री दिसत आहे. मात्र, नांदूरशिंगोटे येथे होणार्‍या विविध प्रकारच्या चोर्‍या झाल्या असून, पोलिसांसमोर त्या चोर्‍या तपासण्याचे आव्हान असताना ही चोरी झाल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदरच्या घटनेची माहिती नांदूर पोलिस दूरक्षेत्राला देताच पोलिस उपनिरीक्षक तांदळकर यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाहीसाठी तपासकामी दिशा दिली.

हेही वाचा:

Back to top button