नाशिक : नांदूरला बिबट्याने पाडला वासरासह कुत्र्याचा फडशा | पुढारी

नाशिक : नांदूरला बिबट्याने पाडला वासरासह कुत्र्याचा फडशा

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. नांदूरशिंगोटे येथील एकलव्यनगर येथे मंगळवारी (दि. 20) रात्री बिबट्याने वासरू व कुत्र्याचा फडशा पाडला. परिसरामध्ये दोन बिबटे हे सोबतच फिरत असून, ते पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ला करू शकतात अशी स्थिती आहे. त्यामुळे या परिसरात शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी (दि. 19) रात्री बाळासाहेब कारभारी शेळके यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासराला बिबट्याने बाहेर खेचून त्याचा फडशा पाडला. त्याचप्रमाणे जवळच असलेल्या कैलास भाबड यांच्या मनोहर नावाच्या कुत्र्याचीही बिबट्याने शिकार केली. या परिसरामध्ये कुत्रे, वासरे यांच्यावर बिबट्याचे हल्ले सुरूच असून, त्यामुळे या परिसरात शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरामध्ये त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी सोमनाथ मेंगाळ यांच्यासह शेळके व एकलव्य नगरवासियांनी केली आहे. एकलव्यनगर येथे 30 मे रोजी पहाटे सोमनाथ मेंगाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता, त्यामधून मेंगाळ सुखरूप वाचले. त्यांनी आपल्या प्रतिकार करून जीव वाचविला. तेव्हापासून या परिसरामध्ये बिबट्यांचे वास्तव्य असून हे बिबटे पिंजर्‍यामध्ये येतच नाहीत. शेतकरी वर्गाला रात्री बाहेर निघणे मुश्किल झाले आहे.

हेही वाचा:

Back to top button