नाशिक : मोहदरी घाटात धावती बीएमडब्लू जळून खाक, पाहा व्हिडीओ

नाशिक : मोहदरी घाटात धावती बीएमडब्लू जळून खाक, पाहा व्हिडीओ

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर येथील मोहदरी घाटात धावती महागडी बीएमडब्लू कार रविवारी (दि. 18) रात्री 11 वाजेच्या सुमारास अचानक पेटली.

या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे समजते. कार (क्र.GJ 04 BE 9882) जळून खाक झाली. सिन्नर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझवली. मात्र तोपर्यंत सुमारे तासभर पुणे महामार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती.

कार चालक अमिन आली सय्यद यांनी स्वतःचे प्राण वाचवले . ते पुण्याहून सुरतच्या दिशेने जात होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान नवनाथ जोंधळे, लाला वाल्मिकी, लक्ष्मण सोनकुसरे, मंगेश कटारनवरे, जयेश बोरसे आदींनी प्रयत्न केले. सिन्नर पोलिसांनीही मदतकार्य केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news