नाशिक: मुलांच्या विक्रीचा प्रकाराबाबत आढावा घेण्यासाठी अंबादास दानवे इगतपुरी दौऱ्यावर

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे अल्पवयीन मुलांच्या विक्रीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेची दखल घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शनिवारी (दि. १०) रोजी इगतपुरी दौरा करणार आहेत.
या प्रकरणातील मृत बालिका गौरी आगिवले हिच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सायंकाळी ४ वा. सांत्वनपर भेट घेणार आहेत. सायंकाळी ५ वा. विश्रामगृह पिंप्री येथे वेठबिगारीवर काम करणाऱ्या बालकांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त कल्याण विभाग, आयुक्त आदिवासी कल्याण विभाग, पोलीस अधीक्षक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन सदर घटनेचा आढावा घेतील.
हेही वाचा