नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला, डोक्यात व पाठीवर वार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना पदाधिकाऱ्यावर महात्मा गांधी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यास व पाठीवर वार झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत. कोकणे यांच्यावर हल्ला का झाला याचे कारण अद्याप समजलेले नाही.