नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, गोदावरीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणाचे सर्व आठही दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. येथून 41,613 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आधीच पालखेड धरणातून 21,560 क्यूसेक, दारणा धरणातून 15,080 क्यूसेक, कडवातून 4,150 क्यूसेक तसेच गंगापूर धरणातून सोडलेले 5,490 क्यूसेक पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात येत असल्याने या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्यामुळे विसर्ग वाढवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. निफाड तालुक्यातून वाहणार्‍या गोदावरी, कादवा, वडाळी, बाणगंगा या सर्वच नद्यांना पूर आला आहे.

हेही वाचा :

Back to top button