Nandurbar : पोलिसाच्या पत्नीलाच पाठवला अश्लील संदेश ; पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

Nandurbar : पोलिसाच्या पत्नीलाच पाठवला अश्लील संदेश ; पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

एका पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस दलातील दुसऱ्या पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीलाच अश्लील संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करत या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हा पोलिस दलात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीला मोबाइलद्वारे अचानक काही अश्लील मेसेज आले. तिने पतीला हा प्रकार सांगताच त्यांनी आलेल्या क्रमांकाचा तपास केला असता, पोलिस मुख्यालयात चालक पदावर कार्यरत एका कर्मचाऱ्यानेच संदेश पाठवल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना त्वरित भेटून याबद्दल माहिती दिली. त्यानुसार खातरजमा करून पोलिस अधीक्षकांनी पुढील कारवाईच्या सूचना देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button