नाशिक : बैलगाडीमध्ये घरी परतत असताना पुराच्या पाण्यात वाहून तिघींचा मृत्यू | पुढारी

नाशिक : बैलगाडीमध्ये घरी परतत असताना पुराच्या पाण्यात वाहून तिघींचा मृत्यू

जातेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील आडगाव येथील मीनाबाई दिलीप बहिरव (45), पूजा दिनकर सोनवणे (15) आणि साक्षी अनिल सोनवणे (11) या तिघी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

सुखलाल बहिरव यांच्या शेतात शुक्रवार (दि.24) दुपारी अचानक जोरदार पाऊस आल्याने बैलगाडीमध्ये घरी परतत असताना खारी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बैलगाडी पलटी झाल्याने तिघीजणी वाहून गेल्याने मयत झाल्या आहेत. यावेळी शेतात काम करण्यासाठी गेलेले उषा सोनवणे, उज्वला सोनवणे, नरेश सोनवणे, विकास बहिरव, समिक्षा सोनवणे हे पाच जणसद्धा बैलगाडीमध्ये त्यांच्यासोबत होते. दैव बलवत्तर म्हणून त्यांना बैलगाडी पलटी होताच आरडाओरडा केला. आसपासच्या शेतक-यांनी त्यांच्या मदतीला साद देत त्वरीत पुराच्या पाण्यात उड्या मारुन इतरांना वाचविले. मात्र त्या तिघींना वाचवण्यात त्यांना अपयश आले. बहिरव हे कन्नड तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असून त्यांची जातेगाव शिवारात शेती आहे. तर घडलेली घटना खारी नदीपात्र बोलठाण गावाजवळ आहे. घटनेची माहिती समजताच आडगाव नागरिकांनी बोलठाण येथील पोलीस नाईक अनिल गांगुर्डे आणि प्रदीप बागूल यांनी नागरिकांच्या सहकार्याने जेसीबीच्या सहाय्याने मदत कार्य सुरु केले. मिनाबाई बहिरव आणि साक्षी सोनवणे ह्या दोघी साधारण तीन किलोमीटर अंतरावर मृत स्थितीत सापडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पूजा सोनवणे ही सापडलेली नाही.

हेही वाचा :

Back to top button