मालेगाव : तळवाडेजवळ ढगफुटीसदृश्य पाऊस | पुढारी

मालेगाव : तळवाडेजवळ ढगफुटीसदृश्य पाऊस

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यात बुधवारी सायंकाळी सर्वदूर पाऊस झाला. तर बागलाणमधील लखमापूर आणि मालेगाव हद्दीवरील तळवाडे शिवारात ढगफुटीसदृश्य पर्जन्यवृष्टी झाली. नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यात साधारण आठवडाभरापासून वाहत असलेल्या ठेंगोडा ते तळवाडे तलाव असा कालवा फुटला. प्रवाही पाणी त्यात पाऊसपाणी यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली.

प्रवाह शेत शिवारातील जमिनीचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुसळधार पाऊस आणि पाट फुटल्याच्या घटनेला तहसीलदार सी आर राजपूत यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने काही नागरिक अडकल्याचे आणि बचावाचे व्हिडिओ वायरल होत आहेत, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Back to top button