नाशिक : पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून, पतीसह पाच जणांवर गुन्हा

नाशिक : पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून, पतीसह पाच जणांवर गुन्हा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
आडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळवाडी शिवारात मागील घरगुती भांडणाची कुरापत काढून पतीने पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह पाच संशयितांविरोधात आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आडगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माडसांगवी परिसरातील माळवाडी येथील संशयित विशाल राजाराम कापसे व त्याची पत्नी आरती विशाल कापसे यांच्यात सोमवारी (दि.१६) रात्री ११ च्या सुमारास जुन्या घरगुती वादातून भांडण झाले. यात तिच्या सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा वाद इतका विकोपाला गेला की यात संशयित पती विशालने लाकडी दांडा असलेल्या लोखंडी फावड्याने पत्नी आरतीच्या डोक्यावर व तोंडावर हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झाल्याने व डोक्यात वर्मी घाव लागल्याने पत्नी आरती जागेवरच गतप्राण झाली.

याप्रकरणी लता रामू जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित पती विशाल राजाराम कापसे, सुरेश राजाराम कापसे, निवृत्ती शंकर कापसे, शोभा उर्फ अलका निवृत्ती कापसे, बंटी निवृत्ती कापसे यांच्याविरोधात आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news