जळगाव : दिवाळीनंतर छठपूजेचा सण साजरा केला जातो. यंदा छठपूजेचा सण ३० ऑक्टोबरला आहे. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये छठ पूजेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असल्याने, यावेळी बहुतेक लोक आपापल्या घराकडे निघतात आणि गाड्यांना खूप गर्दी असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने छठ पुजेसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यात काही गाड्या भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरीसाठी स्थायिक झालेल्या उत्तर भारतीयांची याठिकाणी संख्या मोठी आहे. येथून मोठ्या संख्येने लोक बिहार, उत्तर प्रदेशकडे छटपुजेसाठी जातात. त्यात दिवाळीनिमित्त आपल्या गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वेने विशेष गाड्यांची सुविधा केली आहे.
विशेषत: छठच्या निमित्ताने यूपी आणि बिहारच्या भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने रेल्वेने १२४ छठ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहेत. यात काही गाड्या भुसावळ मार्गे धावणाऱ्या आहेत.
भुसावळ मार्गे धावणाऱ्या गाड्या…
०१०४३ लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर पूजा विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस ३० ऑक्टोबरपर्यंत दर रविवारी आणि गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.१५ वाजता समस्तीपूरला पोहोचेल. ०१०४४ समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस पूजा विशेष गाडी ३१ ऑक्टोबरपर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी समस्तीपूर येथून ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ०५५२९ जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस पूजा विशेष गाडी ८ नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवारी रात्री ११.५० वाजता जयनगरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ०५५३० लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पूजा विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी सकाळी ००.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता जयनगरला पोहोचेल.