नंदुरबार : गांधीधाम एक्स्प्रेसला आग; जीवितहानी नाही

नंदुरबार : गांधीधाम एक्स्प्रेसला आग; जीवितहानी नाही

नंदुरबार ; पुढारी वृत्‍तसेवा

नंदुरबार रेल्वे स्थानकानजिक गांधीधाम पुरी एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री कारला आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने रेल्वेस्थानकावरील जोडलेल्या पाईपलाईनमधून पाणी मारणे सुरू असल्यामुळे आग आटोक्यात आली. रेल्वे स्थानकाचे वाणिज्य अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

तातडीने आग लागलेला डबा वेगळा करण्यात आला. हा डबा प्रवाशांचा नसल्याने कोणा व्यक्तीच्या जीविताची हानी झालेली नाही. खाद्यपदार्थ बनवणारी पॅन्ट्री कारला आग लागल्याने हा प्रसंग उद्भवला. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर पँट्री कार वेगळी करण्यात आली. सकाळी 11.30 वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न चालू होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news