कर्मचार्‍याच्या हातून पळविली एक लाखाची रोकड ; चोरट्यांचा धूम स्टाईल पोबारा

कर्मचार्‍याच्या हातून पळविली एक लाखाची रोकड ; चोरट्यांचा धूम स्टाईल पोबारा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : पतसंस्थेचा रोखपाल एक लाख रुपयांची रक्कम घेऊन पतसंस्थेत जात असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील रक्कम असलेली पिशवी हिसकावून धूम स्टाइल पोबारा केला. सोमवारी (दि.24) दुपारी 1 च्या सुमारास सिद्धिविनायक हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. परिसरात  या घटनेमुुळे खळबळ उडाली आहे.

सोनांवे येथील गोवर्धन पतसंस्थेची सिन्नर येथे सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या इमारतीत शाखा असून संस्थेचे रोखपाल संजय किसनराव जाधव (61) यांनी सूर्योदय संकुलमधील नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेतून एक लाखांची रक्कम काढली. ही रक्कम एका पिशवीत गुंडाळून ते पतसंस्थेकडे जात असताना, यशवंत डायग्नॉस्टिकसमोर समोरून मोटारसायकलवरुन आलेले चोरटे त्यांना आडवे झाले. काही कळण्याच्या आत चोरट्यांनी जाधव यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून शिवाजीनगरकडे पोबारा केला.

जाधव यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. नागरिकही गोळा झाले. मात्र अज्ञात चोरटे क्षणार्धात घटनास्थळावरून गूल झाले. जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय माळी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news