NEET-PG Exam : आज होणारी नीट परीक्षा पुढे ढकलली

नवीन तारीख लवकरच जाहीर करणार
NEET-PG Exam
नीट परीक्षाFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि.२३) होणारी नीट पीजी (NEET-PG) प्रवेश परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर सूचित केली जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. (NEET-PG Exam)

लवकरच परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल

आज रविवार (दि.२३) रोजी नीट पीजी परीक्षा होणार होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (दि.२२) म्हटले आहे, उद्या (दि.२३) होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

या परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर सूचित केली जाईल. पुढे म्हटले आहे, काही स्पर्धात्मक परीक्षांबाबत झालेल्या आरोपांच्या अलीकडच्या घटना लक्षात घेऊन, आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय परीक्षा राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेच्या मजबूततेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.

NEET-PG Exam
CSIR UGC NET Exam : संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली

पेपर फोडल्यास १० वर्षे तुरुंगवास, १ कोटी दंड, केंद्राकडून कायदा लागू

नीट (NEET) आणि यूजीसी- नेट (UGC-NET) परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भविष्यात पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने शुक्रवारी सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, २०२४ अधिसूचित केला. देशभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक आणि सामायिक प्रवेश परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचा या कायद्याचा उद्देश आहे.

NEET-PG Exam
विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा तारखांमध्ये मुदतवाढीनंतरही बदल नाही !

या वर्षी फेब्रुवारीमध्ये संसदेत मंजूर केलेल्या या कायद्यात फसवणुकीला आळा घालण्यासाठी किमान ३ ते ५ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्यांना ५ ते १० वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी १ कोटी रुपयांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. परीक्षा व्यवस्थापन, सेवा पुरवठादार अथवा इतर कोणत्याही संस्थेसह एखादी व्यक्ती अथवा व्यक्तींच्या गटाने संघटित गुन्हा केल्यास त्यांना ५ वर्षांपेक्षा कमी नसलेल्या परंतु १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल आणि या गुन्ह्यासाठी दंड १ कोटी रुपयांपेक्षा कमी नसेल, असे हा कायदा सांगतो.

एखाद्या संघटित स्वरुपाच्या पेपर फुटीच्या गुन्ह्यात एखाद्या संस्थेचा सहभाग आढळल्यास त्या संस्थेची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यात आहे आणि त्यातून परीक्षेचा प्रमाणित खर्चही वसूल केला जाईल.

NEET-PG Exam
दहावी, बारावी परीक्षा शुल्कात १२ टक्क्यांनी वाढ

काय आहे कायद्यात तरतूद?

हा कायदा परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना दंडात्मक तरतुदींपासून संरक्षण देतो. या कायद्यानुसार प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका फोडणे, परीक्षेदरम्यान उमेदवारांना अनधिकृत संवादाच्या माध्यमातून मदत करणे किंवा उपाय प्रदान करणे, संगणक नेटवर्क किंवा संसाधनांशी छेडछाड करणे, परीक्षेला डमी बसणे, फेक परीक्षेचे आयोजन करणे किंवा बनावट कागदपत्रे जारी करणे आणि गुणवत्ता किंवा रँकसाठी कागदपत्रांशी छेडछाड करणे आदी मार्ग अयोग्य असल्याचे कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

NEET-PG Exam
विद्यापीठ पीएच.डी.साठी घेणार पेट परीक्षा! ‘या’ तारखेनंतर होणार वेळापत्रक जाहीर

या कायद्यांतर्गत येणारे गुन्हे अजामीनपात्र आहेत. पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त पदापेक्षा कमी दर्जाचा नसलेला कोणताही अधिकारी या कायद्यान्वये गुन्ह्याचा तपास करू शकतो. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारला या प्रकरणी तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपविण्याचा अधिकार आहे.

NEET-PG Exam
शिवेसना नाव-चिन्ह गोठवण्याचा नीच प्रकार खोकेवाल्या गद्दारांमुळेच : आदित्य ठाकरे

NTA DG सुबोध कुमार यांची हकालपट्टी

देशभरात झालेल्या 'नीट' आणि 'नेट' परिक्षांमधील गैर- व्यवहारानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी निवृत्त आयएएस प्रदीप सिंह खरोला हे एनटीएचे नवीन महासंचालक असतील. प्रदीप सिंह खरोला हे कर्नाटक कॅडरचे आयएएस राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या 'नीट' पेपरफुटी आणि 'नेट' परीक्षेच्या गैरव्यवहारानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कार्यप्रणालीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. याप्रकरणी आता सरकारने मोठी कारवाई केली आहे.

NEET-PG Exam
'परीक्षा' प्रक्रियेत सुधारणा करण्‍यासाठी उच्‍चस्‍तरीय समिती स्‍थापन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news