CSIR UGC NET Exam : संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली

एनटीएने पुढे ढकलली सीएसआयआर-यूजीसी-नेट परीक्षा
CSIR UGC NET Exam
संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षाFile photo

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २५ ते २७ जून दरम्यान होणारी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक 'एनटीए'ने शुक्रवारी प्रसिद्ध केले आहे. CSIR UGC NET Exam

देशभरातील सर्व उमेदवारांना संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आले आहे. त्याचबरोबर परीक्षा व शहराची पूर्वसूचना देण्यात आली होती. त्या अनुषंगाने २५ ते २७ जून या कालावधीत होणारी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा जून २०२४ ही अपरिहार्य परिस्थिती व स्थानिक समस्यांमुळे पुढे ढकलण्यात येत आहे.

परीक्षेचे सुधारित वेळापत्रक : https:///csirnet.nta.ac.in. या अधिकृत संकेतस्थळाद्वारे नंतर जाहीर केले जाईल. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन अपडेट घ्यावे, असे आवाहन एनटीएने केले आहे.

CSIR UGC NET Exam
युवकांचा सहभाग अन् नेट वारी स्वागतार्ह

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news