नंदुरबारला ओमायक्रॉनचे दोन रूग्ण; आजपासून जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले ‘हे’ नवे निर्बंध

संग्रहीत
संग्रहीत
Published on
Updated on

नंदूरबार : शहरात ओमायक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी दिली. एकाचा स्वॅब 17 डिसेंबर तर एकाचा 29 डिसेंबर रोजी घेण्यात आला होता. त्यांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आज रविवार दि.9 जानेवारी रोजी प्राप्त झाला.

दोघानांही जिल्हा सामान्य रुग्णालयात ॲडमिट केले होते. आता दोघानांही डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या दोघांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख मनीषा खत्री यांनी दिनांक 10 जानेवारी म्हणजे आजपासून नवे निर्बंध लागू होणार असल्याचे एका आदेशाद्वारे जाहीर केले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वा प्रवासाचे 72 तासादरम्यानचे आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल सोबत असणे गरजेचे आहे. सदर बाब हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतुकीला लागू असेल.

रस्ते मार्गांनी प्रवास करणारे वाहनचालक / क्लीनर्स/इतर स्टाफ यांनीही सदर बाबींचे पूर्ण पालन करावे.

सर्व शाळा आणि महाविद्यालय, कोचिंग क्लासेस हे दिनांक 15/02/2021 रोजीपावेतो बंद राहतील.

इयत्ता 10 वी व 12 चे शैक्षणिक क्रियाकरिता संबंधित शिक्षण बोर्डाचे वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे शिक्षण विभागाने आवश्यक कार्यवाही करावे.

वर्गातील अध्यापना व्यतिरिक्त प्रशासकीय बाबी व कार्यवाही नियमितपणे शिक्षकांकडून करण्यात यावे.

शिक्षण विभाग, तंत्र व उच्चशिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास विभागांकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी.

याशिवाय सदर विभागांना इतर बाबींकरिता करावयाच्या नियोजनाकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचेकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असेल.

जिल्हयात सकाळी 05.00 वाजेपासून ते रात्री 11.00 वाजेपावेतो जमाबंदी लागू करण्यात आलेने सदर वेळेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या गटात फिरणेस मनाई असेल.

रात्री 11.00 वाजेनंतर सकाळी 05.00 वाजेपावेतो संचारबंदी लागू असल्याने अत्यावश्यक उद्दिष्टे वगळता फिरण्यास मनाई असेल.
कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालयप्रमुखांचे लेखी परवानगीशिवाय कार्यायालयात प्रवेशास मनाई असेल. प्रमुख कार्यालयांमध्ये नागरिकांशी चर्चेकरिता व्ही. सी. ची सुविधा कार्यान्वित करण्यात यावे.

शासकीय बैठकांकरिता ऑनलाईन व्ही. सी. सुविधेचा वापर करण्यात यावा. कार्यालयातील वा बाहेरील अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता सदर बाब लागू असेल.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम ची सोय उपलब्ध करुन देण्यात यावे.

सर्व शासकीय कार्यालयांध्ये कोविड अनुरुप पद्धती (CAB Covid Appropriate Behaviour) चे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित विभागप्रमुख / कार्यालयप्रमुख यांनी करावी.

सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमची सोय उपलब्ध करुन देण्यात यावे. शक्यतो कार्यालयीन वेळा 24 तास करण्यात येऊन कर्मचाऱ्यांचे ड्युटी कालावधीमध्ये तशाप्रकारचे आवश्यक बदल करण्यात यावे, ज्यात त्यांचे प्रवासाचे वेळाचे विचार करण्यात यावे तथापि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधित आवश्यक नियोजन करण्यात यावे.
कोविड- 19 लसीकरणांचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. तथापि ज्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण व्हावयाचे आहे त्याकरिता त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.

कार्यालयांध्ये कोविड अनुरुप वर्तनाचे (CAB) अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित कार्यालय व्यवस्थापनप्रमुख यांनी करावी.

सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वा राजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे.

जलतरण, जिम्स, स्पा, पुढील आदेशापर्यंत बंद असतील.

वेलनेस सेंटर्स आणि ब्युटीपार्लर सलून / केशकर्तनालये 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. दुकांनामध्ये केसकर्तनाशिवाय इतर सर्व प्रकारचे कार्यांना मनाई असेल. दररोज रात्री 10.00 ते सकाळी 7.00 पर्यंत सदर दुकाने बंद असतील.

मनोरंजनाची स्थळे जसे की, उद्याने, बाग-बगीचे / पार्क्स, किल्ले, पर्यटन/प्रेक्षणीय स्थळे इत्यादी पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
शॉपींग मॉल्स, बाजार संकुले, रेस्टॉरेन्ट, उपहारगृहे, नाट्यगृह/चित्रपटगृहे इ. 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर माल्सच एकूण क्षेमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे.

कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. सदर ठिकाणी कोविड-19 रॅट चाचणी करिता बुथ/किऑस्क उपलब्ध ठेवण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. दररोज रात्रौ 10.00 ते सकाळी 8.00 पर्यंत सदर दुकाने बंद असतील. पार्सल सुविधा / होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news