जळगाव : भुसावळात ३२ वर्षीय महिलेचा निर्घृण खून | पुढारी

जळगाव : भुसावळात ३२ वर्षीय महिलेचा निर्घृण खून

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरले आहे. ३२ वर्षीय महिलेचा  खून करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली.

भुसावळ शहरात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. मद्यपी पतीचा महिलेने खून केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पुन्हा शहरातील सुचित शुभम बारसे (वय ३२, रा. कवाडे नगर, भुसावळ) या विवाहितेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. त्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे.

संशयित आरोपीने महिलेच्या छातीवर चाकूचे अनेक वार केले आहेत. तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावर पोलिस चौकी क्रमांक सात असून या चौकीच्या मागे असलेल्या निर्जनजागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस यंत्रणेने धाव घेतली.

महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, सहाय्यक निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

हेही वाचलं का?

Back to top button