पुढारी ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे शिल्लक ठेवलेली नाहीत असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत केलं होतं. त्याचबरोबर राज्यपालांनी याबाबत जे होतंय ते होऊ दे असे म्हणून आपली बाजू काढली आहे. मात्र हे सरकार राज्यपालांचेच अधिकार कमी करत सुटले आहे असा आरोपही पाटील यांनी केला होता.
चंद्रकांत पाटलांच्या या टिकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, चंद्रकात पाटलांना आरोप करण्याशिवाय दुसरं काहीच काम उरलेलं नाहीय. विरोधक असे बोलतात की आता राष्ट्रपती राजवटच लागणार आहे. विरोधकांना वाटल्यास ते महाविकास आघाडी विरोधात अविश्वास ठरावही आणू शकतात असे त्यांनी विरोधकांना सुनावले.
उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. या पार्श्वभुमीवर अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद परिषद घेण्यात आली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.
हेही वाचा