पिंपळनेर ; पुढारी वृत्तसेवा : रात्र गस्तीवर असलेल्या पिंपळनेर पोलिसांना देशी-विदेशी दारूसह ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील आरोपीने मात्र पलायन केले आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे एपीआय सचिन साळूंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कुडाशी-वासॉ भागात गस्तीवर असताना हॉटेल कार्तीकीसमोर उभारलेल्या वाहनावर त्यांना संशय आला. (nashik liquor seized)
वाहनाच्या मागील व पुढच्या बाजूच्या वेगवेगळ्या नंबर प्लेट हाेत्या. पुढील बाजूला जीजे ०५ आर.एच १०६८ तर मागील बाजुला एम.एच.०२ ई.यु. ३३४१ अशा क्रमांकाची नंबर प्लेट होती. गस्ती पथकाने आपले वाहन संशयित वाहनाजवळ नेले. यावेळी वाहन रस्त्यावर साेडून चालक पसार झाला.
पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता वाहनामध्ये देशी-विदेशी दारुचा १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांचा माल आढळून आला. १० लाखाच्या गाडीसह सुमारे ११ लाख ३६ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक आणि मालक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा शोध घेतला जात आहे.
पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन साळूंखे, विशाल मोहने, मकरंद पाटील, विजय पाटील भूषण वाघ, रविंद्र सूर्यवंशी, पंकज वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचलं का?