बुलडाणा : विधानपरिषद निवडणूकीसाठी ९८.३० टक्के मतदान ; १४ मतदारांनी दाखवली पाठ | पुढारी

बुलडाणा : विधानपरिषद निवडणूकीसाठी ९८.३० टक्के मतदान ; १४ मतदारांनी दाखवली पाठ

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा 

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज मतदान ९८.३०% झाले. १४ मतदारांनी मतदान केले नाही. यामध्ये एमआयएमचे ८ तर इतर ६ मतदार आहेत.

शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया व भाजपाचे वसंत खंडेलवाल या दोघांत सरळ लढत झाली. शिवसेना व भाजपा हे नेहमीचेच विरोधक मैदानात असल्याने एमआयएमने या निवडणूकीत तटस्थ राहण्याची भुमिका आधीच जाहीर केली होती. परंतू अन्य सहा मतदारांनी मतदान टाळण्यामागचे कारण कळू शकले नाही. विधान परिषद निवडणूकीत एक-एक मत मिळवण्यासाठी मोठी चुरस असते.

अकोला-बुलडाणा-वाशिम जिल्ह्यातील २२ केंद्रांवर आज मतदान झाले. यामध्ये एकूण ८२२ मतदारांपैकी ८०८ जणांनी मतदान केले.
मलकापूर येथे ५, बार्शिटाकळी ५, शेगाव २, अकोला १ व बुलडाणा येथे १ अशा १४ मतदारांनी मतदान केले नाही.

हेही वाचा

Back to top button