जळगाव : तोंडी तिहेरी तलाक प्रकरण; पतीचा अटकपूर्व जामीन फेटाळला | पुढारी

जळगाव : तोंडी तिहेरी तलाक प्रकरण; पतीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

चोपडा येथे राहणाऱ्या युवकाने आपल्या पत्नीला तोंडी तलाक दिला होता. त्‍याच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात तोंडी तलाक प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पतीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, चोपडा येथील मुस्तफा कॉलनीतील रहिवासी रईसोद्दीन रफीयोद्दीन जहागीरदार याचा जुलै २०१९ मध्ये एका तरुणी सोबत विवाह झाला होता. रईसोद्दीने आपल्या पत्नीचा माहेरून पैसे आणावेत म्हणून छळ करत होता. यानंतर त्याने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या पत्नीला तोंडी तिहेरी तलाक देऊन तिला माहेरी पाठवून दिले होते.

या अनुषंगाने संबंधीत महिलेच्या तक्रारीवरून रईसोद्दीन आणि त्याच्या आईच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रईसोद्दीन याच्या आईला चोपडा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी त्याचा अर्ज मात्र फेटाळला आहे.

Back to top button