नाशिक : द्राक्षपंढरीत पावसानंतर दाट धुक्याने नुकसानीत भर | पुढारी

नाशिक : द्राक्षपंढरीत पावसानंतर दाट धुक्याने नुकसानीत भर

उगांव (ता निफाड) ; पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यात दोन दिवस संततधार झालेल्या अवकाळी पावसाबरोबर आता द्राक्षपंढरीत दाट धुके अन दवबिंदू पडू लागले आहे. यामुळे द्राक्षाच्या घडकुजीचे संकट अधिक गडद झाले आहे.

संततधार पाऊसामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच धुके व दवबिंदू वाढू लागल्याने घडकुजीची तीव्रता वाढलेली आहे. दवबिंदु द्राक्षघडावर साचुन ते द्राक्षघड कुजविण्यास परिणामकारक ठरत आहेत.

द्राक्षबागांवरील पाणी व दवबिंदू निघून जावे म्हणून द्राक्ष उत्पादक द्राक्षबागेला असलेल्या तारांना चिखलातही जाऊन हलवत आहेत. अखेरपर्यंत शक्य तसा सामना करण्यात द्राक्षपंढरीत द्राक्ष बागायतदार प्रयत्न करत आहेत. मात्र नैसर्गिक संकटापुढे हतबलता येऊ लागली आहे.

घडकूज व मणीगळ या संकटावर उपाययोजना नाही. ते झालेले नुकसान भरुन निघणे अशक्य आहे. द्राक्ष उत्पादकांना कायमस्वरुपी द्राक्षाला संरक्षण देणारी प्लास्टिक आच्छादनाची पध्दत अवलंबावी लागणार आहे. त्याकरिता शासनाचे सहकार्य मिळायला हवे.
– प्रभाकर मापारी, ‌‌‌‌द्राक्ष उत्पादक उगांव ता. निफाड

Back to top button