कळवण तालुक्यातील नांदुरी येथे पावसाच्या थंडी गारठून १४ मेंढ्यांचा मुत्यू - पुढारी

कळवण तालुक्यातील नांदुरी येथे पावसाच्या थंडी गारठून १४ मेंढ्यांचा मुत्यू

नाशिक; पुढारी वुत्तसेवा : कळवण तालुक्यातील नांदूरी येथे १ डिसेंबर रोजी रात्रभर झालेल्या पावसातील ( अवकाळी पाऊस ) थंडीत गारठून १४ मेंढ्यांचा मुत्यू झाला असल्याची माहिती नांदूर येथील तलाठी महेश वाघ व कोतवाल यांनी दिली आहे

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मेंढपाळ उत्तम महाराज काळे (रा. विजापूर, तालुका साखरी, जिल्हा धुळे) हे आपल्या २५० मेंढ्या घेऊन दोन-तीन दिवसांपूर्वी नांदुरी या ठिकाणी सह परिवारासह मुक्कामास होते. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसाच्या थंडीत गारठून १४ मेंढ्या मुत्युमुखी पडल्या. मुत्युमुखी पडलेले मेढ्याचा पंचनामा तलाठी, पशुवैघकीय अधिकारी याच्या उपस्थितीत करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र वातावर खराब असल्याने या ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

मुत्यू झालेल्या मेंढ्यांमध्ये १० मेंढ्या व ४ नवजात पिल्लांचा समावेश आहे. रानोरान उन्हाळा पावसाळ्यात फिरणाया मेढपाळ कुटुंबाचे साधारण १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Back to top button