हट्टा पोलिसांची कारवाई : अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पकडले

हट्टा पोलिसांची कारवाई : अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पकडले
Published on
Updated on

आडगाव रंजेबुवा; पुढारी वृत्तसेवा

हिंगोली येथील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे जवळ असलेल्या ढवळगाव मधील पूर्णा नदी पात्रातून सोमवारी दिनांक 29 रोजी दुपारी तीनच्या सुमारास अवैद्य वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर हट्टा पोलिसांनी पकडले. यामध्ये सुमारे दीड ब्रास वाळू असून त्याचे अंदाजे किंमत पाच हजार रुपये आहे.

दरम्यान ढवळगाव येथील ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. 38 बी 4373 ट्रॅक्टर मधून चालक-मालक ज्ञानेश्वर भिकाजी शिरसागर हे वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे पेालीसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस निरीक्षक गजानन मोरे, अरविंद गजभार, गणेश लेकुळे, यांनी शिरसागर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.

दरम्यान, परिसरातील अवैध धंद्याचे प्रमाण वाढल्याने, पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परिसरामध्ये ढवळगाव, माटेगाव, परळी, सावंगी आदी गावातील नदीपात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असतो. अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी यापुढेही कडक कारवाई करणार असल्याचे हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा

व्हिडिओ पहा : भंगार विकत ते बघतायत मुलांना हिंदकेसरी बघण्याचे स्वप्न | Story of Wrestlers

https://youtu.be/Hyp_H0RMsO0

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news