जळगाव : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

जळगाव : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : एकलग्न गावाजवळ ट्रकच्या धडकेत सोमवारी (दि.२९) एक ३५ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हरसिंग भिला राठोड (वय ३५ , रा. सारवातांडा ता. पारोळा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर त्याचा साथीदार गंभीर रीत्या जखमी आहे.

हरसिंग राठूड हा जळगावहून घरी सारवातांडा येथे साथीदारासोबत निघाला होता. संध्याकाळी एकलग्न गावाजवळ गुजरातकडून आलेल्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीस मागून जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील हरसिंग व त्याचा मित्र दोघे खाली पडले. यात हरसिंग राठोड व त्याचा मित्र यांना जखमी अवस्थेत जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, हरसिंग राठोड यास वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर यांनी मृत घोषित केले. तर त्याचा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हरसिंग राठोड यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, 5 दिवसांपूर्वी जन्मलेला मुलगा असा परिवार आहे.

Back to top button