सीएम ठाकरेंची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने जळगावचा फरीद खान ५० शिवसैनिकांना अजमेरला घेऊन जाणार | पुढारी

सीएम ठाकरेंची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने जळगावचा फरीद खान ५० शिवसैनिकांना अजमेरला घेऊन जाणार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जळगावचे शिवसैनिक (Jalgaon ShivSainiks) फरीद खान यांनी ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होवून त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ख्वाजा मीया बाबांच्या दर्ग्यावर 11 किलो न्याज व 50 बांधवांना अजमेर येथील प्रसिद्ध बाबांच्या दर्ग्यावर स्वखर्चाने घेऊन जाण्याची मन्नत मागितली होती. (Jalgaon ShivSainiks)

ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावरील ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.

ईश्वराच्या कृपेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांची प्रकृती बरी होत आहे. या पार्श्वभुमीवर जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ख्वाज्या मिया दर्ग्यावर न्याज वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात होता.

शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, फरीद खान, फिरोज पिंजारी, जाकिर पठाण, यांच्या हस्ते दर्ग्यावर फुलांची चादर परिधान करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. आता 21 नोव्हेंबर रोजी शिवसैनिक फरीद खान हे 50 शिवसैनिकांना अजमेर येथे स्वःखर्चाने घेऊन जाणार आहेत.

हे ही वाचा :

Back to top button