कनार्टकातील घटनेचे नाशिकमध्ये पडसाद, कर्नाटका बँकेवर शाही फेकून श्रमिक सेनेने केला निषेध | पुढारी

कनार्टकातील घटनेचे नाशिकमध्ये पडसाद, कर्नाटका बँकेवर शाही फेकून श्रमिक सेनेने केला निषेध

नाशिक : (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटक राज्यातील बागलकोटमध्ये महापुरुषांचा पुतळा हटविल्या प्रकरणाचे पडसाद नाशिकमध्ये उमटले असून, श्रमिक सेनेने कॅनडा कॉर्नरवरील कर्नाटका बँकेवर शाहीफेक करून या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

श्रमिक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास शहरातील कॅनडा कॉर्नरवरील कर्नाटका बँकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावून कर्नाटक सरकारचा निषेध केला. तसेच कर्नाटक बँकेच्या नामफलकावर शाही फेक करून काळे फासण्यात आले. कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

यावेळी श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, महानगर प्रमुख मामा राजवाडे, श्रमिक हॅाकर्स सेनेचे कार्याध्यक्ष संदीप जाधव, भूषण कासार, संतोष साळुंके, शहराध्यक्ष सागर दाते, बाबा खैरनार, महेंद्र शर्मा, मनोज सोनार, चंदू इंगळे आदींसह श्रमिक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

हेही वाचा :

Back to top button