एवढीच सहानुभूती असेल तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे : नाना पटोले | पुढारी

एवढीच सहानुभूती असेल तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे : नाना पटोले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसमुळे शरद पवार पंतप्रधान झाले नाही, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मोदी यांना पवारांबाबत इतकी सहानुभूती असले तर भाजपने त्यांना पंतप्रधान करावे, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. बुधवारी (दि.९) नाशिक दौऱ्यावर आलेल्या काँग्रेन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिसांचार सुरू आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करत नाही. ते केवळ राजकीय भाषणबाजी करत द्वेषातून बोलतात. देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह महागाईबाबत त्यांनी चुप्पी साधली आहे. आता मोदींची ‘मन की बात’ ही कोणी ऐकण्यास तयार नाही. मणिपूर हिसांचारप्रकरणी पंतप्रधानांनी मौन धारण करणे हे दुर्भाग्यपूर्ण असल्याची टिका यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

निवडणुका आल्या की भाजपच्या सर्व्हेक्षणांना पेव येतो. जनतेच्या कोर्टात जेव्हा चेंडू येतो. तेव्हा ते याेग्य निर्णय घेत असल्याचे कर्नाटक निवडणुकीतून समोर आले आहे. यापुर्वीही लोकांनी सर्व्हे पालटवले आहे. सध्या जनतेच्या मनात काँग्रेस असून, राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर होईल, असे भाकित पटोले यांनी वर्तवत मुख्यमंत्र्यांकडून डिनरसंदर्भात निरोपाचे खंडन केले.

Back to top button