आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे : देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे : देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जाण्यावरुन श्वेतपत्रिका सरकारने सादर केली, त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाजप महाराष्ट्र द्वेषी असल्याची टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला असे वाटत होते की किमान आदित्य ठाकरे तरी थोडा अभ्यास करुन बोलतील. मात्र त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय ? असे फडणवीस म्हणाले.

नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा 122 वा दीक्षांत समारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या समारंभात फडणवीसांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी पावसाळी अधिवेशनातून सर्वसामन्य जनतेला बरच काही मिळालेलं आहे. शेतक-यांना मदत मिळाली आहे, वेगवेगळ्या योजना आपण आणल्या आहेत त्यातून महाराष्ट्र हा आणखी पुढे जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, देशात महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा नाव लौकिक आहे. पोलिस दलासमोर असलेली नवीन आव्हाने सोडविण्यासाठी पोलिसांना ट्रेनिंग आपण देत आहोत. नवीन युगातील आव्हाने पेलण्यासाठी पोलिस दल सज्ज असेल असा विश्वास आहे. देशातील सर्वात मोठा सायबर प्लटफॉर्म आपण महाराष्ट्रात तयार करत आहोत. एकाच फ्लॅटफार्मवर सगळ्यांना आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याद्वारे सायबर गुन्हेगारी मोडून काढता येईल. लवकरच 18 हजार पदांची पोलिस भरती देखील होणार असल्याचे यावेळी फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news