मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी | पुढारी

मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

त्र्यंबकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी आदिवासी संघटनांनी विराट मोर्चा आयोजित केला होता. मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि महिलांवर अत्याचार करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आदिवासी बांधवांनी मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन दिले.

मोर्चाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिवासी जमातीवर मैतेई समाजाकडून अत्याचार सुरू आहे. मणिपूर जळत आहे. त्यामुळे आदिवासींना न्याय मिळण्यासाठी मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मानवतेला काळिमा फासणार्‍या नराधमांना फाशीची सजा देण्यासंदर्भात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Back to top button