नाशिक : भद्रकालीत जुगार अड्ड्यावर कारवाई, १५ जुगाऱ्यांना पकडले | पुढारी

नाशिक : भद्रकालीत जुगार अड्ड्यावर कारवाई, १५ जुगाऱ्यांना पकडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भद्रकालीतील मोहंमद अली मेन्शन इमारतीत सुरू असलेल्या जुगार क्लबवर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना पकडले असून, त्यांच्याकडून रोकड व जुगाराचे साहित्य असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार क्लब सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करीत सोमवारी (दि.३१) मध्यरात्री १२.३० वाजता क्लबवर छापा मारला. यात एका महिलेस १६ जण जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले. हे जुगारी तीन पत्ती जुगार खेळत होते. त्यामुळे पोलिसांनी १६ संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वरि‌ष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, विशाल काठे, मुक्तार शेख, आप्पा पाणवळ, अमोल कोष्टी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

या संशयितांची धरपकड

मोहमंद नागोरी अब्दुल रहेमान (अंबड लिंक रोड), तौसिफ रफीक पठाण (रा. खडकाळी), मुस्तफा गुलाब शेख (रा. पंचशीलनगर), जाकीश मोहमंद खान (रा. खडकाळी), गुलाम ख्वाजा शेख नबी (रा. कोकणीपुरा), साजीद जैनोउद्दीन शेख (रा. कथडा), फिरोज अमीर शेख (रा. खडकाळी), उजेफा अहमदअली (रा. टाकळी रोड), समीर जावेद खान (रा. खडकाळी), अजहर अश्पाक शेख (रा. वडाळा), अफरोज बिसमिल्ला कुरेशी (रा. बागवानपुरा), इरफान आबाद शेख (रा. तलावडी), राजीद लढ्ढा कुरेशी (रा. अकोला), मोहसीन गुलाब कोकणी (रा. पखाल रोड), रिजवान रमजान शेख (रा. खडकाळी) असे पकडलेल्या संशयित जुगाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी एका महिलेसही ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

Back to top button