नाशिक : कंटेनरने बसचालकास चिरडले; चालक ठार | पुढारी

नाशिक : कंटेनरने बसचालकास चिरडले; चालक ठार

लासलगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर या मार्गासाठी बस क्रमांक एम एच १४ -३६४१ ही बस आज (शनिवार) सकाळी लासलगाव बस आगारात प्रवेश घेत होती. यावेळी बसचालक खाली उतरून पाहणी करत असताना कंटेनरने त्‍यांना धडक दिली. कंटेनरने बसचालकास चिरडले. यामध्ये चालकाचा मृत्‍यू झाला.

बसमधून उतरून चालक एस. पी. निकम हे पाहणी करीत होते. यावेळी कंटेनर क्र एम एच ४३ वाय ७४६३ ने धक्का दिला. निकम यांना जोराचा धक्‍का देउन त्‍यांना फरफटत नेले. या दुर्दैवी अपघातात चालक एस. पी. निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे लासलगावकर सुन्न झाले. या घटनेनंतर संतप्त बसचालक व वाहक तसेच लासलगाव बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद पाडली.

Back to top button