नाशिक : चांदवड मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी राहुल कोतवाल तर व्हाईस चेअरमनपदी पुष्पा बिरार अविरोध | पुढारी

नाशिक : चांदवड मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी राहुल कोतवाल तर व्हाईस चेअरमनपदी पुष्पा बिरार अविरोध

चांदवड : पुढारी वृत्तसेवा :

चांदवड तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व आर्थिक वाहिनी असलेल्या दि. चांदवड मर्चंट्स को. ऑफ बँकेच्या चेअरमनपदी राहुल शिरीषकुमार कोतवाल तर व्हाईस चेअरमनपदी पुष्पा बिरार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी समर्थकांनी एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

चांदवड मर्चंट्स बँकेचे माजी चेअरमन अॅड. नरेद्र कासलीवाल व व्हाईस चेअरमन सईद अहमद खलील अहमद शेख यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त झाले होते. यासाठी चांदवडच्या सहाय्यक निबंधक तथा अध्यासी अधिकारी सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बुधवार (दि.१२) रोजी बँकेच्या सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत चेअरमन पदासाठी राहुल शिरीषकुमार कोतवाल व व्हाईस चेअरमन पदासाठी पुष्पा बिरार यांचा प्रत्येकी एक – एक अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड करीत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सविता शेळके यांनी केली. यावेळी नवनियुक्त चेअरमन राहुल कोतवाल व व्हाईस चेअरमन पुष्पा बिरार यांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या बैठकीस बँकेचे संचालक अॅड. नरेद्र कासलीवाल, सईद अहमद खलील अहमद शेख, अशोक व्यवहारे, राजकुमार संकलेचा, अॅड. भूषण पलोड, सुनिल कबाडे, दत्तात्रय राऊत, भिकचंद व्यवहारे, आदित्य फलके, महेंद्र गांधीमुथा, जाहिद शेख, जाकीर शहा, शंभूराजे खैरे, भारती देशमुख, डॉ. शिल्पा कुंभार्डे, खुशबू छाजेड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन सूर्यवंशी, व्यवस्थापक अनिल सांगळे आदी उपस्थित होते.

यावेळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाताई कोतवाल, डॉ. संजय कोकणे, विजय क्षत्रिय, बद्रीनारायण जाधव, प्रविण हेडा, नंदकुमार कोतवाल, दीपक व्यवहारे, डॉ. जीवन देशमुख, रमेश जाधव, अंकुर कासलीवाल, बबलू घमंडी, कैलास कोतवाल, अल्ताफ तांबोळी, रत्नदीप बच्छाव आदीसह नागरिक, सभासद, व्यापारी उपस्थित होते.

 कमी वयात एवढ्या मोठ्या बँकेच्या चेअरमन पदाची सूत्रे हाती आल्याने थोडे दडपण आहे. अशा परिस्थितीत माझे सहकार क्षेत्रातील गुरु माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कामकाज नक्कीच प्रकाशझोतात आणण्यासाठी प्रयत्न करेल. बँकेची प्रगती व आलेख कसा वाढेल या दुर्ष्टीने कामकाज केले जाईल. बँकेचे सभासद, कर्जधारक यांना नेहमीच झुकते माफ दिले जाईल. यासाठी जेष्ठ संचालकानी मला योग्य ते सहकार्य, मार्गदर्शन करावे. – राहुल कोतवाल, चेअरमन, चामको, बँक, चांदवड.

हेही वाचा :

Back to top button