नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे जोरदार स्वागत | पुढारी

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे जोरदार स्वागत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले आहेत. नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथे छगन भुजबळ यांचे आगमन झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

छगन भुजबळ यांच्या मतदार संघात आज शरद पवार सभा घेत आहेत. त्यापार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील आजच नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन केले आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात समर्थकांनी ढोल -ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भुजबळ यांचे स्वागत केले. यावेळी जेसेबीने भला मोठा हार छगन भुजबळ यांच्या गळ्यात घालण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक उपस्थित होते.

 

Back to top button