भुजबळ मुक्त येवल्यासाठी सरसावले, इतिहासात प्रथमच चारही नेते एकाच मंचावर | पुढारी

भुजबळ मुक्त येवल्यासाठी सरसावले, इतिहासात प्रथमच चारही नेते एकाच मंचावर

नाशिक : पुढारी ऑनलाइन

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता शरद पवार यांनी महाराष्ट्र दौ-याची सुरुवात केली आहे. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आज शरद पवारांची पहिली सभा होत आहे. काही वेळातच शरद पवार हे येवल्यात या सभेसाठी पोहचणार आहेत.

दरम्यान येवल्यात शरद पवार यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. येवल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच  माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, माजी आमदार मारोतराव पवार आणि शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे हे चारही मातब्बर नेते  शरद पवारांच्या सभेसाठी एकाच मंचावर उपस्थित राहिले आहे. भुजबळ मुक्त येवला करण्यासाठीच हे सगळे एकवटले असल्याचे इथे पाहायला मिळते आहे.

ज्या येवला येथून शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन केले. त्याच येवल्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात शरद पवार यांची सभा होत आहे. ज्याठिकाणावरुन शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी सभा घेतली होती, त्याच येवल्यात शरद पवार छगन भुजबळ यांच्याविरोधात सभा घेत आहे.  आज शरद पवार नेमकं काय बोलणार, ते छगन भुजबळांचा काय समाचार घेणार याकेडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Back to top button