Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या

Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या
Published on
Updated on

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृतसेवा
इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असुन आफन अन्सारी असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या हाणामारीत दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धामणगांव येथील एसएमबीटी हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एसएमबीटी कॉलेजजवळ रविवारी (दि.25) मध्यरात्री साडे दहाच्या सुमारास गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून स्विफ्ट कार MH02 BJ 6525 अडवुन कारमधील दोन व्यक्तिंना दहा ते पंधराजणांच्या जमावाकडून लोखडी रॉड व दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. यात अफान अफान अब्दुल मजीद अंसारी, (३२ वर्ष, राहणार कुरेशी नगर, दुधवाली चाळ, कुर्ला पुर्व, मुंबई) याचा मारहाणीत मृत्यू झाला. तर नासिर हुसेन कुरेशी (२४ वर्ष, राहणार कुरेशी नगर दुधवाली चाळ, कुर्ला पूर्व, मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधिक्षक सुनील भामरे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन रात्रीतुन ८ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी देखील इगतपुरी तालुक्यात असाच एक प्रकार घडला होता. कसारा घाट परिसरात एका जमावाकडून गोमांस वाहतूक तस्करीच्या संशयातून वाहन अडवण्यात आले होते. यावेळी दोन गटात झालेल्या बाचाबाचीत दोघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आले. यावेळी जमाव मारहाण करीत असल्याने एक जण जीव वाचवण्यासाठी आंधारात पळून गेला. मात्र अंधारात पळताना तो थेट २५० फुट खोल उंटदरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पंधरा दिवसाच्या अंतराने एकाच तालुक्यात तशीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. स्विफ्ट कार मध्ये गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून आदिनाथ जमाव करून दोघांना मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला होता. पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे , पोलीस उपअधिक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news