Nashik : अभिनयासाठी नाट्यवाचनासारखी चळवळ गरजेची : अभिनेता भरत जाधव | पुढारी

Nashik : अभिनयासाठी नाट्यवाचनासारखी चळवळ गरजेची : अभिनेता भरत जाधव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवीन तरूण पिढीला वाचण्याची सवय नसल्याने दोन पान त्यांना पुरेसे वाटतात. या सर्व गोष्टी तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याने अभिनयाची खोली, संवादातील चढ उतार त्यांना कळत नाही. आजही प्रयोग करतांना आम्ही दाेन महिने नाटकाचे अभिवाचन करून सराव केला करतो. अभिनयासाठी नाट्वाचनासारखी चळवळ गरजेची असल्याचे मत अभिनेता, रंगकर्मी भरत जाधव यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय नाट्य परिषद तर्फे श्रीराम वाघमारे लिखित मृगजळ एकांकिका अभिवाचनाचा कार्यक्रम परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते शुभेच्छा देतांना बोलत होते. यावेळी अध्यक्ष प्रा रविंद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, डॉ अनिरूध्द धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. जाधव म्हणाले, नाट्य परिषद जिव्हाळ्याचा विषय आहे. एकांकिका स्पर्धांपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंतचा कलाकाराचा प्रवास परिषद जवळून बघत असते. त्यासाठी नाटकाचे अभिवाचन सारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. नवीन विषय तुम्हाला ताजातवाना करतो. केवळ संघर्ष न करता संघर्ष केल्याचा आनंद घ्यात ते यश आहे त्याची चव चाखता आली पाहिजे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी कॅण्टीनचा शुभारंग अभिनेता भरत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. मृगजळ या एकांकिकेचे अभिवाचन ईश्वर जगताप, माेहिनी भगरे, प्रिया सुरते, जय शुक्ल, अनुजा ओढेकर, तनुज तिवारी, प्रांजल सोनवणे यांनी केले.

आणि कालिदासची कॅण्टीन सुरू झाली

कित्येक दिवसांपासून कालिदासमध्ये कॅण्टीनची सुविधा नसल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुर हाेता. कपभर चहासाठी नाट्यगृहाच्या बाहेर पडून टपरीवर चहा घेण्यासाठी जावे लागत हाेते. मात्र (दि.१५) पासून नाट्यगृहात कॅण्टीन सुरू झाल्याने रविवारी तू तू मी मी नाटकाच्या वेळी प्रेक्षक चहा, समोसा, पॉपकॉर्नचा आस्वाद घेतांना दिसले.

Back to top button