धुळे : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या उत्पादनात मोलाची भर पडावी या हेतूने राज्यांतर्गत पीक स्पर्धा राबविण्यात येते. राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात पीकस्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल कृषि विभागाने नुकताच जाहीर केला आहे. स्पर्धेत बाजरी पीकामध्ये आदिवासी गटात शिरपूर तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण जगन पावरा (रा. हाडाखेड) यांनी हेक्टरी 17.6 क्विंटल उत्पन्न घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
राज्यात (आदिवासी गटातुन) बाजरी पीकात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लक्ष्मण जगन पावरा (रा. हाडाखेड 17.6 क्वी/हे), जगदिश हारु पावरा (रा. हाडाखेड 17.4 क्वी/हे), वामन लालसिंग पावरा (रा. हाडाखेड 16.9 क्वी/हे) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच राज्यात (आदिवासी गटातुन) मका पीकात धुळे तालुक्यातील गंगाराम वेस्ता पावरा (रा. चाकडु 90 क्वी/हे). रणजित गणा पावरा (रा.चाकडु 89.5 क्वी/हे) यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर नाशिक विभागात (आदिवासी गटातुन) मका पीकात शिरपूर तालुक्यातील सुंदया सुरज्या पावरा (रा.चाकडू), सोयाबिन पिकात साक्री तालुक्यातील सुमित्रा सूर्यकांत गावित (रा. बरुडखे) खरीप ज्वारी पिकात शिरपूर तालुक्यातील भिमसिंग मनशा पावरा (रा. जोयदा), बाजरी पिकात शिरपूर तालुक्यातील सुरेश अत्तरसिंग पावरा (रा. हाडाखेडा) यांनी प्रथम क्रमांक, खरीप ज्वारी पिकात शिरपूर तालुक्यातील श्रीराम गणेश पावरा (रा. खैरखुटी) यांनी व्दितीय, बाबुलाल आरशी पावरा (रा.बुडकी) यानी तृतीय क्रमांक पटकावला आहे. (सर्वसाधारण गटातून) खरीप ज्वारी पीकात धुळे तालुक्यातील नवल दुला अहिरे (रा. जुनवणे) यांनी प्रथम क्रमांक, मका पीकात शिंदखेडा तालुक्यातील ज्ञानेश्वर भिका पवार (रा. पढावद) यांनी व्दितीय, मंगलदास जगन्नाथ पाटील (रा. भोकर) यांनी व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्यात (सर्वसाधारण गटातून) खरीप बाजरी पीकात साक्री तालुक्यातील संजय पंडीतराव पाटील (रा. धमणार), तानु गोठु ठेलारी (रा. अंबापुर), रोहीदास कडजी भामरे (रा. काळगाव) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक पटकावला आहे. मका पीकात धुळे तालुक्यातील बारकु शंकर देसले (रा. देऊर) यांनी प्रथम, शिंदखेडा तालुक्यातील गोरख छगन महाजन (रा. मिलाने) यांनी व्दितीय, धुळे तालुक्यातील राजाराम दामोदर साबळे (रा. खेडे) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सोयाबिन पीकात शिरपूर तालुक्यातील सुभाष उखाजी महाजन (रा मिलाणे) यांनी प्रथम, दरबारसिंग सुरतसिंग गिरासे (रा. आमोदे) यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. (आदिवासी गटातून) सोयाबिन पीकात साक्री तालुक्यातील राजु किरण पवार (रा. वाल्हवे) यांनी प्रथम, अशोक रुपचंद बहिरम (रा. सुकापुर) यांनी व्दितीय, विक्रम मुरलीधर अहिरे (रा. पोवरे) यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. चालु वर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांच्या होणाऱ्या पीक स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले.