Nashik : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा इशारा | पुढारी

Nashik : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा इशारा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे.

औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या. पोस्ट व्हायरल करणार्‍यांच्या घरावर चाल करून प्रक्षुब्ध जमावाने सिद्धार्थनगर व दसरा चौक येथील प्रार्थनास्थळावर दगडफेक केली.

कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेचे उमटलेले पडसाद पाहाता नाशिक शहरातील सर्व नागरिकांना सायबर पोलिसांनी महत्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप, ट्विटर इत्यादी सारख्या समाज माध्यमांवरुन कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या, अवमानकारक सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा संदेश व्हायरल करु नये. असे केल्यास त्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक सायबर पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button