धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन | पुढारी

धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन

पिंपळनेर,(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दहिवेल येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमेश्वर कृषी मार्केट समोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले कांद्याने भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे लावून आंदोलन केले. शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये भावाने कांदा विकावा लागत आहे. सोमेश्वर कृषी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची अतिशय लूट होत आहे. शेतकऱ्यांचा चांगल्या क्वालिटीचा कांदा सुद्धा तीन ते चार रुपये भाव प्रमाणे कांदा व्यापारी घेत आहेत. या भावामध्ये शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च सुद्धा निघत नाही आहे. शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेला भाव कांदा व्यापाऱ्यांना या भावात कांदा द्यायला परवडत नाही.तरी तुम्ही कांद्याचे भाव जरा व्यवस्थित लावा,तर कांदा व्यापारी शेतकऱ्यांना धमकावून उत्तर देतात जर तुम्हाला परवडत असेल तर आणा नाहीतर ट्रॅक्टर परत घेऊन जा अशी उडवा उडवीची उत्तरे व्यापाऱ्यांकडून मिळतात.

आज एका शेतकऱ्याचे कांदे दोन ट्रॅक्टर मध्ये आणले तर एका ट्रॅक्टरला चार रुपये भाव आणि तोच कांदा दुसऱ्या ट्रॅक्टर मधला सहा रुपये अशी तफावत आढळून आल्यामुळे शेतकरी संतप्त झाले म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतक-यांमध्ये व कांदा व्यापाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.बाहेरील मार्केटमध्ये जसे की पिंपळगाव,करंजाड,सटाणा, या मार्केटमध्ये कांद्याला अकरा रुपये पासून तर पंधरा रुपये पर्यंत भाव मिळत आहे आणि दहिवेल कृषी मार्केटमध्ये चार रुपये पासून तर आठ रुपये पर्यंत भाव मिळतो आणि वरून एका क्विंटल मागे 9 रुपये प्रमाणे व्यापारी कपात घेतात त्यांच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे सूर दिसत होते.

या प्रकाराबाबत साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती निवडून आलेले सभापती,उपसभापती यांनी लक्ष द्यायला हवे असे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. या गोष्टीत ते सुद्धा लक्ष देत नाही अशी शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली.या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डोंगरु बहिरम,लक्ष्मण सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक तसंघटनेचे साक्री तालुका उपाध्यक्ष श्री.संजय बच्छाव दहिवेल हे रस्त्यावर उतरून यांची एकच मागणी होती की कांद्याला रस्ता भाव मिळाला पाहिजे.

यावेळी दहिवेल पोलीस प्रशासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन मागे घ्या नाहीतर तुमच्यावर गुन्हे दाखल करु असा दम भरला. शेतकऱ्यांची अशी सगळीच कडून गळचेपी होत असेल तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत तर काय करेल.त्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकरी व डोंगर बहिरम यांनी सांगितले की शेतकऱ्यांवर असा अन्याय होत असेल तर आम्ही आमच्या कांद्याने भरलेल्या(ट्रॅक्टर)वाहनासह जेलमध्ये बसायला तयार आहोत.

कांदा प्रश्नावर कोणतेच आमदार खासदार राजकीय नेते बोलायला तयार नाहीत पुढील येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकरी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असे तालुका उपाध्यक्ष संजय बच्छाव यांनी बोलून दाखवले. डोंगर बहिरम यांनी शेतकऱ्यांना असे सांगितले की कांद्याला व्यवस्थित भाव याच्यापुढे जर मिळाला नाही तर आपण मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.या रस्ता रोको आंदोलनात दहिवेल परिसरातील हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.

हेही वाचंलत का?

Back to top button