वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त | पुढारी

वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर व परिसरात उष्णतेची लाट कायम आहे. मंगळवारी (दि. ६) तापमानाचा पारा ३५.९ अंश सेल्सियसवर पाेहचल्याने हवेत उष्मा अधिक जाणवत होता. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले. दरम्यान, पुढील चार दिवस जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.

अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे वारे घोंगावते आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई व पालघर तसेच गुजरातच्या दक्षिणेकडील भागात आगामी काळात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, नाशिक शहर व ग्रामीण भागात सध्या उष्णतेची लाट कायम आहे. शहराचा पारा ३६ अंशांपर्यंत जाऊन पोहचल्याने सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. उष्णतेपासून बचावासाठी नागरिक एसी, कुलर व पंख्याची हवा घेणे पसंत करीत आहेत. तसेच शीतपेयांच्या सेवनालाही पसंती मिळते आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. शेती व दैनंदिन जीवनमानावर त्याचा परिणाम झाला आहे. शेतकरी बांधव पहाटे व किंवा दुपारी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर शेतीच्या कामांना प्राधान्य देत आहेत.

हेही वाचा:

Back to top button