Nashik : नांदगाव- मालेगाव रोडवर कार पुलावरुन खाली कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू | पुढारी

Nashik : नांदगाव- मालेगाव रोडवर कार पुलावरुन खाली कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिकच्या नांदगावमध्ये कारचा भीषण अपघात झाला असून मारुती सुझुकी इको गाडी पुलावरून थेट नदीत कोसळली. या अपघातात एका चारवर्षीय बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे.

नांदगावमधील नाग्यासाक्या धरणासमोरील नांदगाव मालेगाव राज्यमार्गावर (दि. 30) रात्री 1 वाजेच्या सुमारास ही भीषण घटना घडली. जालना येथून एक लग्नसोहळा आटोपून प्रवासी कारने नांदगाव मार्गे मालेगावच्या दिशेने निघाले होते. नदीवर कठडे नसलेल्या पुलावरुन गाडी थेट नदीत कोसळल्यामुळे तिघांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

डॉ. याकुब रमजान मन्सुरी (50), अफरोज अब्दुल लतीफ मन्सुरी(35) व शिफा वसीम मन्सुरी (4) या तिघांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. तसेच 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.  हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button