नाशिक बाजार समितीचा सर्वांगीण विकास करा : छगन भुजबळ यांचे देवीदास पिंगळे यांना आवाहन

नाशिक बाजार समितीचा सर्वांगीण विकास करा : छगन भुजबळ यांचे देवीदास पिंगळे यांना आवाहन
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती देवीदास पिंगळे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. बाजार समितीचा अधिक विकास साधा, असे भुजबळ यांनी आवाहन करत पिंगळे यांचा यावेळी सत्कार केला.

राष्ट्रवादीने जिल्ह्यातील १३ पैकी ७ बाजार समित्यांमध्ये सभापतिपद मिळवत बाजी मारली. तर पाच ठिकाणी उपसभापतिपददेखील मिळविले. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक बाजार समितीचा वाद अनेकदा सर्वोच्य न्यायलायापर्यंत वाद पोहोचला. मात्र, त्यावरही मात देत न्यायालयाच्या निकालानुसार तब्बल १ महिन्याने सभापती, उपसभापती निवड झाली. यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नाशिक बाजार समितीचा आणखी विकास करा अन् शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, असे आवाहन यावेळी भुजबळ यांनी पिंगळे यांना केले.

यावेळी संदीप पाटील, तुकाराम पेखळे, किरण कातड, शुभम पिंगळे, रूपेश पिंगळे यांच्यासह नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदाधिकारी उपस्थित होते.

अडथळ्यांची शर्यत पार करत विजयश्री

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून विरोधी गटाने जुने विषय उकरून काढत अनेकदा निवडणूक प्रक्रियेत स्थगिती आणण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पिंगळे गटानेदेखील माघार न घेता 'अरे ला कारे' म्हणत प्रत्येक मुद्द्याला तोडीस तोड उत्तरे दिली आणि अखेर निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडलीच. एकूणच, या सर्व घडामोडी पाहता नवनिर्वाचित सभापती देवीदास पिंगळे यांनी सहकारातील रणनीती आणि आपल्या दांडग्या अनुभवाचे दर्शन तर घडविलेच परंतु गेल्या अनेक वर्षांची विजयाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा सभापतिपदाची माळ आपल्याच गळ्यात टाकण्यात ते यशस्वीही ठरले.

पिंगळेंचा विक्रमी षटकार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर बाजी मारत अखेर देवीदास पिंगळे हे सभापतिपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पिंगळे यांनी सहाव्यांदा सभापती होण्याचा मान मिळविला असून, एकाच बाजार समितीत सहा वेळा सभापती होण्याचा विक्रमही राज्यात त्यांच्याच नावावर कोरला गेला आहे. पिंगळे यांनी पहिल्यांदा १९९२-९३ मध्ये सभापतिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर १९९५-१९९८, २०००-२००३, २००३-२०१७, २०२०-२०२२, २०२३-२०२८ याप्रमाणे सभापतिपदाची सूत्रे हाताळली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news