नाशिक : भद्रकालीत गुटख्याचा साठा जप्त, दुकान सील ; अन्न औषध प्रशासनाची कारवाई | पुढारी

नाशिक : भद्रकालीत गुटख्याचा साठा जप्त, दुकान सील ; अन्न औषध प्रशासनाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अन्न व औषध प्रशासनाने भद्रकाली परिसरातील के. के. ट्रेडर्स दुकानात छापा टाकून गुटखा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी विक्रेता व पुरवठादाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुकानही सील करण्यात आले आहे.

अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर व अविनाश दाभाडे यांना गुटख्यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने नसिम शॉपिंग सेंटर येथील दुकानात गुरुवारी (दि.१८) छापा टाकून दुकानाची तपासणी केली. त्यावेळी प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. पथकाने ८१ हजार २६८ रुपयांचा साठा जप्त केला व दुकान सील केले आहे. या प्रकरणी रासकर यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात विक्रेता अफजल कय्युम शेख व पुरवठादार वैभव मुराडे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सहायक आयुक्त मनीष सानप, सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा किंवा विक्री करू नये. तसेच कोणी तसे करत असल्यास त्यांच्याविरोधात १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी.

– मनीष सानप, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन

हेही वाचा :

Back to top button