एक ‘राइट’ स्वाइप ठरू शकते राँग…

एक ‘राइट’ स्वाइप ठरू शकते राँग…
Published on
Updated on

नाशिक : दीपिका वाघ

डिजिइन्फो 

पार्टनर शोधण्यासाठी जेन झी पासून ते ज्येष्ठांपर्यंत वेगवेगळे डेटिंग अ‍ॅप सर्रास वापरले जातात. यंगस्टर्स, लग्न मोडलेले, लग्न होणारे, नोकरी करणारे असे अनेक जण आपला एकटेपणा घालवण्यासाठी या ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. या अ‍ॅप्समुळे काहींना त्यांचे खरे प्रेम मिळते, तर काही त्यात फसवले जातात. लॉकडाऊननंतर ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर अधिक वाढला आहे. यात प्रोफाइल आवडले, तर राइट स्वाइप अन् नाही आवडले, तर लेफ्ट स्वाइप केले जाते. हे सोपे वाटत असले, तरी यामध्ये काही छुप्या गोष्टी असतात. म्हणून ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपवर जाताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याबाबत काही टिप्स…

* ऑनलाइन भेटणारे मुलगा-मुलगी एकमेकांसाठी अनोळखी असतात. प्रोफाइलवरून एक बेसिक अंदाज येतो. त्यानंतर मैत्रीला सुरुवात होते. प्रोफाइलवर पूर्ण विश्वास न ठेवता खबरदारी घेऊनच मैत्री स्वीकारावी.
* डेटिंग अ‍ॅपवर डेटिंग प्रोफाइलमध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी असतात. फोटो, आवड आणि पत्ता. खरा फोटो असला, तरी त्यावरून पत्ता किंवा इतर तपशील समोरच्याला कळणार नाही याची काळजी घ्यावी.
* डेटिंग अ‍ॅपवर पूर्ण नावाचा उपयोग करणे शक्यतो टाळावे. त्याचबरोबर इतर सोशल मीडियाचे खाते डेटिंग अ‍ॅपला अटॅच करू नका. यावरून तुमची बरीच माहिती समोरच्या व्यक्तीला सोयीने कळू शकते.
* डेटिंग अ‍ॅपच्या बिल्ट इन मेसेज प्लॅटफॅार्मचा वापर करावा. मॅच मिळाल्यावर त्यांना स्वत:विषयी सर्व माहिती सांगू नये. तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलत आहात हे नेहमी लक्षात असू द्यावे.
* मैत्री झाल्यानंतर लगेच मोबाइल नंबर शेअर करण्याची घाई करू नये. एक गुगल फोन नंबर द्यावा आणि तो तुमच्या फोनवर फॉरवर्ड करावा. एकदा गुगल व्हॉइसमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा क्षेत्र कोड आणि उपलब्ध फोन नंबर निवडायचा आहे.
* प्रेमात पडल्यानंतर आवडत्या व्यक्तीबद्दल कुणीही काही वाईट ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसते. त्यामुळे समोरच्यांनी कितीही सांगितले की, तो मुलगा / मुलगी वाईट आहे, त्यापासून लांब राहा, तरी ऐकले जात नाही. अशावेळी दुर्लक्ष न करता स्वत: खात्री करावी, पडताळून पाहावे, चौकशी करावी मगच पुढचे पाऊल उचलावे.
* बोलण्यावर कधीही भाळू नये. गोड बोलूनही फसवणूक केली जाऊ शकते. एकटेपणाच्या भावनांशी खेळून बर्‍याचदा गैरफायदा घेतला जातो. पैशांची मागणी केली जाते, इमोशनली ब्लॅकमेल केले जाते, खोट्या कथा सांगून दिशाभूल केली जाते.
* नव्याने प्रोफाइल तयार करण्यासाठी प्रत्येक डेटिंग अ‍ॅपची प्रोसेस वेगवेगळी असते. साइन अप करण्यासाठी मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, नाव, पत्ता, माहितीची गरज पडू शकते. अति सेफ्टी गाइडलाइन देणार्‍या अ‍ॅप वापरताना यूजर्सना जास्त प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू शकतात. अशावेळी सर्व गाइडलाइन फॉलो कराव्यात.
* जे अ‍ॅप नोंदणीसाठी पैशाची मागणी करतात ते प्रायव्हसी सुविधा देतात. उदा. एखाद्या अ‍ॅपवर स्वत:चे लोकेशन सांगायचे नसेल, तर त्यासाठी त्यांच्या सुविधेचा वापर करता येतो. त्यासाठी फक्त थोडे पैसे खर्च करावे लागतात. काही अ‍ॅपवर चॅटिंगनंतर अनमॅचचा पर्याय उपलब्ध असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news