नाशिकपाठोपाठ मालेगावात उंटांची तस्करी; पाडळदे शिवारातून ४३ उंट ताब्यात | पुढारी

नाशिकपाठोपाठ मालेगावात उंटांची तस्करी; पाडळदे शिवारातून ४३ उंट ताब्यात

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : नाशिक पोलिसांपाठोपाठ मालेगाव पोलिसांनीही आज (दि.८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उंटांचा कळप घेऊन जाणार्‍या जथ्याविरोधात कारवाई केली.

काही वर्षांपासून मार्च – एप्रिल महिन्यात उंटांचे कळप रस्त्याने मार्गक्रमण करत असल्याचे दिसून आले आहे. तर, मोठ्या मालवाहू ट्रकमध्येही कोंबून उंटांची वाहतूक केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यातही गुन्हेही दाखल झाले होते. गेल्या आठवड्यात दिंडोरी पोलिस ठाण्यात ७ उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सुमारे १११ उंटांना पकडून गोशाळेत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आठवडाभरानंतर मालेगाव हद्दीतून चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या उंटाच्या कळपाला मालेगाव तालुका पोलिसांनी आज रोखले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उंटांचा जथा पाडळदे शिवारात थांबविण्यात आले. पोलिसांनी उंट कुठे घेऊन निघालेत, याबाबत प्राथमिक चौकशी केली. त्यात समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. पशुधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी उंटाची तपासणी केली. काही उंटांना त्वचेचा आजार, काही अशक्त असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक उपचार होऊन हे सर्व उंट शेंदुर्णीच्या गोशाळेत नेण्यात आले. याप्रकरणी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या अहवालानुसार पोलिसांत गुन्हा दाखल होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button